कोरोनाचा पतंग उडतोय उंच

Foto
निर्बंधात ढील...
राज्यात सहा दिवसांत 1 लाख तर जिल्ह्यात सतराशे रुग्ण वाढले
अनलॉक 4 मध्ये शासनाने अनेक निर्बंध खुले केले आहेत. जिल्हाबंदी हटवून संचार मुक्त करण्यात आला. बससेवा पूर्ववत झाली, व्यवसायिक प्रतिष्ठानासह मॉल, सर्व दुकाने खुली केली. मोकळ्या जागेत व्यायामालाही परवानगी देण्यात आली. शहरात गठीत केलेला कोरोना टास्क फोर्स संपुष्टात आला आहे.  पॉझिटिव रुग्णाची संपर्क साखळी शोधण्याची तसदी  यापुढे घेतली जाणार नाही. एकीकडे निर्बंधात अशी ढिल मिळत असताना कोरोनाचा पतंग मात्र उंच उंच उडताना दिसतो. याकडे कुणीही गांभीर्याने पाहायला तयार नाही.
एकीकडे सर्वत्र हळूहळू सर्व व्यवहार पूर्वपदावर येत आहे. तर दुसरीकडे मात्र कोरोनाचा आकडा पाहिला तर वाढतच चालला आहे. त्यात राज्यातील 1 ते आजपर्यंत कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहिली तर तब्बल 1 लाख 3 हजार 173 ने भर पडली आहे. त्यामुळे आजपर्यंत एकूण राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही 8 लाख 83 हजार 862 वर जाऊन पोहचली आहे. तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील 1 ते आजपर्यंतची वाढती रुग्णसंख्या पाहिली तर तब्बल 1 हजार 771 रुग्ण वाढले आहेत. यावरून कोरोना अजून संपलेला नाही. त्यामुळे सावधानता बाळगण्याची गरज आहे. हे स्पष्ट होते. नागरिकांनी सर्वांनी काळजी घेतली पाहिजे. 
31 ऑगस्ट पर्यत औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाहिली तर 23 हजार 460 होती. त्यात 1 ते आज (दि.6) या सहा दिवसात 1 हजार 771 रुग्णांची भर पडल्याने आज जिल्ह्यातील एकूण कोरोनाचा आकडा 25 हजार 231 वर जाऊन पोहचला आहे. यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे. यामुळे नागरिकांनी आतातरी याकडे गांभीर्याने घेण्याची गरज आहे. राज्यात 31 तारखेपर्यंत कोरोनाचा आकडा 7 लाख 80 हजार 689 वर होता. त्यात आजपर्यंत सहा दिवसात 1 लाख 3 हजार 173 रुग्णांची भर पडल्याने आज राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 8 लाख 83 हजार 862 वर जाऊन पोहचली आहे. 
जगात सहाच दिवसांत वाढले 16 लाख रुग्ण
जगातील कोरोनाचा आकडा पाहिला तर 31 ऑगस्ट पर्यत 2 कोटी 53 लाख 91 हजार 204 वर होता. त्यात सहा दिवसात आजपर्यंत 16 लाख 74 हजार 608 रुग्णांची भर पडल्याने आज जगातील कोरोनाबाधितांची संख्या ही 2 कोटी 70 लाख 65 हजार 812 वर जाऊन पोहचली आहे. त्यामुळे चिंतेत आणखी भर पडली आहे.
कोरोना संपलेला नाही
लॉकडाऊन च्या काळानंतर सर्वत्र मार्केट आणि काहीप्रमाणात बसेस देखील आता उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय हळूहळू आता सर्व उद्योगक्षेत्र पूर्वपदावर येत आहेत. असे असले तरी आर्थिक संकट ओढवू नये यासाठी सर्व उघडण्यात आलेले आहेत. हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे. परंतु कोरोना संपला असा अनेकांचा गैरसमज झाला असल्याने अनेकजण विनामास्क, सोशल डिस्टनसिंग न पाळताना फिरताना दिसतात. याचा परिणाम रुग्णसंख्या वाढत चालली आहे.
देशात सहा दिवसांत 4 लाख 92 हजार 566 रुग्ण वाढले
देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही 31 ऑगस्ट ला 36 लाख 21 हजार 245 होती. त्यात 1 सप्टेंबर ते आजपर्यंत या सहा दिवसांत 4 लाख 92 हजार 566 रुग्णांची नव्याने भर पडल्याने आज देशातील कोरोनाबाधितांची संख्या ही 41 लाख 13 हजार 811 वर जाऊन पोहचली आहे. 
कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील वाढले
मधुमेह, निमोनिया त्याबरोबर कोव्हीड-19, ऑक्सिजनचे प्रमाण कमी असणे यामुळे रुग्णांचा मृत्यू झाल्याची कारणे अहवालात समोर आले आहेत. तसेच रुग्णालयात उशिरा उपचारासाठी दाखल होणे यामुळे देखील मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे 31 ऑगस्ट पर्यत 699 रुग्णांचा मृत्यू झाल्याची संख्या होती. त्यात आजपर्यंत या सहा दिवसात 42 रुग्णांचे कोरोनामुळे मृत्यू झाल्याने आजपर्यत 741 जणांचा जिल्ह्यात कोरोनाने बळी घेतले आहेत. तर राज्यात 1 सप्टेंबर ते आजपर्यंत 1877 रुग्णांचा बळी गेला त्यामुळे आतापर्यंत राज्यात 26 हजार 276 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय देशातील 31 ऑगस्ट पर्यत कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या ही 64 हजार 469 वर होती. त्यात सहा दिवसात 6 हजार 157 जणांचे आणखी मृत्यू झाले त्यामुळे देशातील आजपर्यत मृत्यू होण्याची संख्या ही 70 हजार 626 वर जाऊन पोहचली आहे. याशिवाय जगभरात कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या 31 ऑगस्ट पर्यत 8 लाख 50 हजार 637 वर होती. त्यात 1 सप्टेंबर ते आजपर्यंत 33 हजार 105 रुग्णांची भर पडल्याने जगातील मृत्यूची संख्या आज 8 लाख 83 हजार 742 वर जाऊन पोहचली आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker